दालमिया फौंडेशन कडून वाटंगी शाळेला ई-लर्निंग संच

वाटंगी येथील प्राथमिक शाळेला "दालमिया भारत फौंडेशन"आसुर्ले पोर्ले पन्हाळा यांचेवतीने ई- लर्निंग संच प्राप्त झाला आहे. वाटंगी येथील दानशूर व्यक्तिमत्व , दालमिया शुगर  हेड आदरणीय श्री . शिवप्रसाद दादा देसाई यांच्या माध्यमातून हा संच उपलब्ध झाला आहे .

    या कामी माजी सरपंच  श्री . संजय पोवार , शाळा  व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. अनिल तेजम, कारखाना संचालक श्री. शिवाजी नांदवडेकर, शाळा व्यवस्थापन शिक्षण तज्ज्ञ श्री शिवाजी गिलबिले सर, श्री. विजयदादा देसाई, विद्यमान सरपंच श्री. मधुकर जाधव, उपसरपंच सौ . मिनाक्षी देसाई , शाळा व्यवस्थापन उपाध्यक्ष सौ. मनिषा बिरजे , संदिप देसाई, उमेश घोरपडे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य तसेच मुख्याध्यापक श्री सुनिल कामत यांनी विशेष  प्रयत्न केले . गटशिक्षणाधिकारी श्री. बसवराज गुरव यांची प्रेरणा मिळाली. यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील रंजकता वाढून गुणवत्ता वाढण्यास मदत होईल . या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

रिपोर्टर

  • Rupesh Adolikar
    Rupesh Adolikar

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Rupesh Adolikar

संबंधित पोस्ट