Breaking News
खेड आळंदी विधानसभा वंचित बहुजन आघाडीचे अधिकॄत उमेदवार रवीभाऊ रंधवे यांना निवडून आणण्यासाठी कार्यध्यक्ष व खेड तालुका अध्यक्ष यांची पत्रकार परिषद खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाच्या आमदारकीच्या निवडणूकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे अधिकॄत उमेदवार रवीभाऊ रंधवे यांना प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करण्यासाठी उमेदवारी देण्यात आली.सर्व सामान्य गोरगरीबांच्या न्याय हक्कासाठी शैक्षणिक आणि शासकीय नोकरीतील आरक्षण वाचविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रवीभाऊ रंधवे यांचा पाठीशी उभे रहावे यासाठी खेड तालुका कार्यअध्यक्ष दत्ताभाऊ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली व दत्ताभाऊ सोनवणे खेड तालुका अध्यक्ष यांच्या समवेत, सहारा हाॅटेल राजगुरूनगर येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी दिनेश गोतरणे,भीमराव गायकवाड,विक्रांतभाऊ आल्लाट,अशोक कडलक,प्रतिक बामणे,सचिन देखणे,तुषार सोनवणे, संजय दुधावडे, विजय दुवधाडे,लकी पाटोळे, अक्षय शिंदे,धीराज कांबळे, बाळासाहेब मोरे,पी.के.पवार साहेब,कडलक सर पत्रकार, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती साबळे व इतर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Live Maharashtra