Breaking News
खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत.अनेक माता पिता भगिनींनी लोकशाही बळकट करण्यासाठी आपला मतदानाचा हक्क बजावला.कोणतीही व्यक्ती मतदानापासून वंचित राहू नये व प्रत्येकाला मतदानाचा अधिकार बजावतं यावा या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी श्री.अनिल दौड साहेब यांनी वरीष्ठांच्या आदेशानुसार निवडणूक प्रक्रियेत कोठे ही अनुचित प्रकार घडू नये व सर्व मतदारांना मतदानाचा अधिकार बजावतं यावा यासाठी उलखनिय कामगिरी केली त्याला खेड तालुक्यातील प्रत्येक गावात मतदारांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.खेड तालुक्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री.अनिल दौड साहेब व तहसीलदार ज्योती ताई देवरे मॅडम यांनी आदिवासी भागात व प्रत्येक ठिकाणी जाऊन मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी प्रयत्न केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Kaluram Ghodake