महाशिवरात्रीसाठी विशेष बस सेवा

मुंबई : महाशिवरात्रीनिमित्त उद्या १८ फेब्रुवारी रोजी बोरिवली पूर्वेतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कान्हेरी लेण्यांकडे आणि बाबुलनाथ मंदिरासाठी विशेष बेस्ट बस सोडण्यात येतील. राष्ट्रीय उद्यान प्रवेशद्वार ते कान्हेरी लेणी या मार्गावर बसमार्ग क्र १८८ ( मर्या.) च्या सहा अतिरिक्त बस फेऱ्या होतील. वाळकेश्वर ते पी. टी. उद्यान- शिवडी (क्रमांक ५७) वाळकेश्वर ते अँटॉप हिल (क्रमांक ६७ ) आणि वाळकेश्वर ते कुलाबा बस स्थानक ( क्रमांक १०३ ) या मार्गांवर सहा अतिरिक्त बस चालविण्यात येतील.

रिपोर्टर

  • Live Maharashtra
    Live Maharashtra

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Live Maharashtra

संबंधित पोस्ट