Breaking News
कारेगाव:-तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये आयोजित विज्ञान प्रश्नमंजुषा कार्यक्रमात कारेगावच्या जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्याने आपल्या ज्ञानाची चमक दाखवली आहे. कृष्णा समाधान चव्हाण याने या स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवून शाळेचे व गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.कृष्णाच्या या यशाबद्दल गावामध्ये आनंदाचे वातावरण आहे. गावाचे सरपंच सौ. नर्मदा विश्वास केंधळे, उपसरपंच सौ. जिजाबाई मोतीराम गायकवाड, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. भागवतराव चव्हाण आणि शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य यांनी कृष्णाचे व त्याला मार्गदर्शन करणाऱ्या मुख्याध्यापक व शिक्षकांचे मन:पूर्वक अभिनंदन केले.
कृष्णाच्या यशाबद्दल ग्रामस्थांनीही कौतुकाचा वर्षाव केला असून, हा विद्यार्थी भविष्यात आणखी मोठे यश संपादन करेल असा विश्वास व्यक्त केला आहे.विज्ञान प्रदर्शनामध्ये शेतकरी साठी बहुउपयोगी स्मार्ट किसान काठी तयार करून आदर्श गुंगे व यश केंधळे यांनी परीक्षकाचे लक्ष वेधले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Bhagvat Chavan