शासनाची दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यावर निलंबनासह कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून अजामीनपात्र फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करा - आमदार बबनराव लोणीकर

१७६ गाव व ९५ वॉटर ग्रीडमध्ये खोटी माहिती देत शासनाची दिशाभूल करणारे अधीकाऱ्यावर निलंबनासह कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून अजामीनपात्र फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करा - आमदार बबनराव लोणीकर


छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकार्‍यांच्या मुख्य अभियंता कार्यालयात आमदार बबनराव लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक संपन्न.१७६ गाव वॉटर ग्रीड मध्ये ५२ गावात पाणी पोहोचले नाही तर ९५ गाव वॉटर ग्रीड मध्ये एकाही गावात थेंबभर पाणी गेलेले नसताना २६ कोटी ४१ लाख १७ हजार २७३ रुपये अंतिम बिल अदा कसे केले?आमदार बबनराव लोणीकरांनी खडसावले.तसेच काम पूर्ण झालेले नसताना १७६ गाव व ९५ गाव वॉटर ग्रीड चे  काम पूर्ण होत नाही तोपर्यंत १२० गाव पाणीपुरवठा योजनेची बिले देण्यात येऊ नयेत असे देखील आमदार बबनराव लोणीकर यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. 


आर्थिक गैरव्यवहार करत ५ लाख लोकांच्या तोंडाचे पाणी पळवण्याचे महापाप महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी केले - आमदार लोणीकर


गावात पाणी पोहोचले नसताना हायड्रोलिक टेस्ट कशी करण्यात आली? कंत्राटदार व अधिकाऱ्यांनी केवळ कागदावर हायड्रोलिक टेस्ट करून २६ कोटीचे  बिल लाटले - आमदार लोणीकर


हायड्रोलिक टेस्ट केलीच नाही तर योजना टिकणार कशी? कंत्राटदारासह मुख्या अभियता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपअभियंता व शाखा अभियंता यांना लोणीकरांनी धरले धारेवर


प्रतिनिधी-

परतुर विधानसभा मतदारसंघातील १७६ गाव वॉटर ग्रीड व ९५ गाव वॉटर ग्रीड भौतिकदृष्ट्या व आर्थिकदृष्ट्या पूर्ण झाली असल्याचा खोटा अहवाल केंद्र व राज्य सरकारला सादर करत शासनाची दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांना आपण कदापि माफ करणार नसून त्यांनी ५ लाख लोकांच्या तोंडचे पाणी पळवले आहे.७ डिसेंबर २०२३ रोजी १७६ गाव वॉटर ग्रीड व २७ डिसेंबर २०२३ रोजी ९५ वॉटर ग्रिडचे बिल खोटी कागदपत्रे दाखल करून अधिकाऱ्यांशी आर्थिक व्यवहार करत कंत्राटदार व अधिकाऱ्यांच्या संगतमताने उचलण्यात आले. त्यामुळे त्यांना तुरुंगाची वारी करावी लागणारच असा स्पष्ट इशारा माजीमंत्री आमदार श्री बबनराव लोणीकर यांनी आज आढाव बैठकीदरम्यान दिला.

छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकार्‍यांच्या मुख्य अभियंता कार्यालयात माजी मंत्री आमदार श्री बबनराव लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली १७६ गाव,९५ गाव वॉटर ग्रीड  व १२० गाव पाणीपुरवठा योजना कामाची आढावा बैठक पार पडली या बैठकीला मुख्य अभियंता मनीषा पलांडे,सदस्य सचिव कार्यालयाचे अधीक्षक अभियंता श्री अजयसिंग, अधीक्षक अभियंता श्री कोळी कार्यकारी अभियंता श्री चव्हाण कंत्राटदार श्री घुले,उप अभियंता श्री लांडगे उप अभियंता श्री गायकवाड उप अभियंता श्री गाझी यांच्यासह गटविकास अधिकारी परतुर श्री तांगडे गटविकास अधिकारी मंठा श्री गगनबोने,गटविकास अधिकारी जालना यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

या बैठकीदरम्यान आमदार लोणीकर बोलत होते पुढे बोलताना श्री लोणीकर म्हणाले की १७६ गाव वॉटर ग्रीड व ९५ वॉटर ग्रीड या अत्यंत महत्त्वकांक्षी योजना असून परतुर विधानसभा मतदारसंघातील ५ लाख लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या वॉटर ग्रीड मुळे संपुष्टात येणार आहे असे असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे मुख्य अभियंता,अधीक्षक अभियंता,कार्यकारी अभियंता,उपअभियंता, शाखा अभियंता यांनी संबंधित कंत्राटदराशी संगणमत करून आर्थिक गैरव्यवहार करत ही योजना पूर्ण झाली असल्याचा अहवाल शासनाकडे सादर केला आहे ही पूर्णपणे शासनाची फसवणूक असून गावात पाणी पोहोचले नसेल तर योजना पूर्ण कशी काय होऊ शकते? असा सवाल देखील यावेळी आमदार लोणीकर यांनी उपस्थित केला.


परतुर तालुक्यातील मापेगाव येथील उद्भव विहिरीवरून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत एकच हायड्रोलिक टेस्ट करण्यात आली. जलशुद्धीकरण केंद्रापासून जलकुंभापर्यंत आणि जलकुंभा पासून पाण्याच्या टाकीपर्यंत जर हायड्रोलिक टेस्ट करण्यात आलीच नाही.तसेच जलकुंबा पासून गावातील पाण्याचा १७६ गाव ९५ गाव या दोन्ही वॉटर ग्रीड मध्ये कुठलीही हायड्रोलिक टेस्ट करण्यात आलेली नाही.  गावागावातील पाण्याच्या टाक्याचे बांधकाम पूर्ण झालेले नाही, असे असताना शासनाकडे खोटा अहवाल सादर करण्याच्या तारखेपर्यंत एकाही गावांमध्ये पिण्याचे पाणी मिळालेले नव्हते असे आसताना योजना भौतिक दृष्ट्या व आर्थिक दृष्ट्या पूर्ण कशी होऊ शकते? असा सवाल देखील आमदार लोणीकर यांनी यावेळी उपस्थित केला.


दि. ७ डिसेंबर २०२३ रोजी १७६ गाव वॉटर ग्रीडचे अंतिम देयक (१३ कोटी २२ लाख ४७ हजार ०३२ रुपये) अदा करण्यात आले त्यावेळी ५२ गावात पाणी पोहोचलेलेच नव्हते ते आजही आजच्या तारखेत पोहोचलेले नाही. तसेच दि. २७ डिसेंबर २०२३ रोजी ९५ गाव वॉटर ग्रीड चे अंतिम देयक (१३ कोटी १८ लाख ७० हजर २४१ रु ) अदा करण्यात आले, त्या तारखेपर्यंत एकही गावात पाणी पोहोचलेले नव्हते असे असताना अधिकाऱ्यांनी मात्र संबंधित कंत्राटदाराशी संगणमत करून आर्थिक व्यवहार करत सर्व गावांमध्ये पाणी पोहोचले असल्याचा खोटा अहवाल सादर केला आहे. १७६ गाव व ९५ गाव वॉटर ग्रीड चे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत १२० गाव पाणीपुरवठा योजनेची कुठलीही देयके देण्यात येऊ नयेत असेही लोणीकर यावेळी म्हणाले. 


पुढे बोलताना लोणीकर म्हणाले की १७६ गाव वॉटर ग्रीड व ९५ गाव वॉटर ग्रीड या दोन्ही योजना पूर्ण झाल्यानंतर संबंधित कंत्राटदाराने तीन वर्षे ही योजना चालवायची आहे त्यानंतर या योजनेचे पूर्ण बिल अदा करणे बाबत शासनाचे निर्देश असताना अधिकाऱ्यांनी आर्थिक गैरव्यवहार करत भ्रष्टाचार करून संबंधित कंत्राटदाराला पूर्ण बिल दिलेले आहे ही बाब अत्यंत गंभीर आणि कुठल्याही परिस्थितीत माफ करणे योग्य नाही त्यामुळे शासनाला खोटी माहिती देणाऱ्या कंत्राटदाराशी संगणमत करून आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्या आणि लाखो लोकांच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना तुरुंगाची वारी करावी लागणार तसेच संबंधित कंत्राटदराला काळ्या यादीत टाकून शासनासह सर्वसामान्य जनतेची फसवणूक करणाऱ्या कंत्राटदार व मुख्य अभियंता अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता उपअभियंता शाखा अभियंता यांच्यावर अजामीन पात्र गुन्हे दाखल करत तात्काळ निलंबित करण्यासंदर्भात मुख्य सचिव,प्रधान सचिव,सदस्य सचिव यांच्याकडे आपण मागणी करणार असल्याचे देखील आमदार बबनराव लोणीकर यांनी यावेळी सांगितले.

गावागावामध्ये पाणी पोहोचले असल्याची खोटी माहिती कंत्राटदाराच्या वतीने मुख्य अभियंता कार्यालयात देण्यात आली व त्या आधारे संपूर्ण बिल देण्यात आले.ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनंतर आपण दिलेली माहिती खोटी असल्याचे बैठकीदरम्यान अधिकाऱ्यांच्या समोर सिद्ध झाले.ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी गावात पाणी पोहोचले आहे किंवा नाही या सदर्भातला लेखी अहवाल गटविकास अधिकाऱ्यांमार्फत मुख्य अभियंता यांच्याकडे दिला आहे. प्रसंगी आमदार बबनराव लोणीकरांनी या शासनाला खोटी माहिती देणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. शासनाच्या पैशाचा अपव्यय करणाऱ्या आणि लाखो लोकांच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करत अजामीनपात्र फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यासंदर्भात कारवाई करणार असल्याचे देखील लोणीकर यांनी स्पष्ट केले.

रिपोर्टर

  • Ramkisan Bodakhe
    Ramkisan Bodakhe

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Ramkisan Bodakhe

संबंधित पोस्ट