Breaking News
महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचा प्रादेशिक परिवहन कार्यालय ताडदेव मुंबई येथे विविध मागण्या व अधिकाऱ्यांच्या बे जबाबदार कामाच्या विरोधात मोर्चा
महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना हि महाराष्ट्रातील जनतेचे अनेक प्रश सोडवण्यात नेहमी अग्रेसर असते पक्षाचे अध्यक्ष मा.राज साहेब ठाकरे यांच्या मार्दर्शनाखाली काम करणारे वाहतूक सेनेचे पदाधिकारी सक्षम पणे काम करत असताना वाहतुकीसंदर्भात असणारे प्रश्न तसेच नवीन चालक परवाना काढताना जनतेला येणारी अडचण अधिकाऱ्यांची बे जबाबदार वक्तव्य नवीन चालकांना परवाना वेळेत न देणे,तसेच माहितीच्या अधिकारात एखांदी माहिती मागितली तर दिशाभूल करणारी माहिती देऊन टाळाटाळ करणे,महाराष्ट्र शासनाचा महसून योग्य पद्धतीने न घेता व्यावसायिकांना पाठीशी घालणे असे प्रकार प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडून होत असल्याची माहिती मिळाल्याने मनसे वाहतूक सेना आक्रमक झाली असल्याचे दिसून आले.अधिकाऱ्यांनी खरी माहिती देऊन हा सगळा प्रकार उघडकीस आणावा असे निवेदन यावेळी देण्यात आले या मोर्च्याचे नेतृत्व मनसे वाहतूक सेना महाराष्ट्र राज्य सरचिटणीस आरिफ शेख यांनी केले त्यांच्या सोबत सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Vijay Saple