मनपा खाजगी शाळांतील गुणवंत शिक्षकांचा सन्मान..

मुंबई - दि. २७, बृहन्मुंबई महानगरपालिका - शिक्षण शिक्षण विभाग खाजगी प्राथमिक शाळा विभाग (R/N, R/C, R/S, P/N, P/S, N, S, T) शाळांचा वार्षिक बक्षीस वितरण व "गुणवंत शिक्षक पुरस्कार" सोहळा दिनांक २७ मार्च २०२४ रोजी आशाताई गवाणकर शाळा गोरेगाव पूर्व येथे आयोजित करण्यात आला . संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन करण्यास शिक्षणाधिकारी सन्मा. श्री. राजू तडवी साहेब, उपशिक्षणाधिकारी (प्रभारी) सन्मा. श्री. विनोद कदम साहेब,  अधीक्षिका सन्मा. श्रीम. माधुरी महाजन मॅडम व विभाग निरीक्षक सन्मा. श्री. गोरखनाथ भवारी साहेब यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले होते.आजच्या सोहळ्यात विभाग निरीक्षक सन्मा.श्री. गोरखनाथ भवारी, विस्तार अधिकारी सन्मा.श्रीम. दीपिका पाटील, विस्तार अधिकारी सन्मा.श्री. मुख्तार शाह साहेब, आशाताई गवाणकर शाळेचे अध्यक्ष प्रा. सन्मा.श्री. केळकर, कार्यवाह सन्मा. श्री. माधुरी पाटील मॅडम व  सन्मा. वैजयंती पाटील या मान्यवरांच्या हस्ते पुढील २५ गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये श्रीम. रसिका दुधवडकर, श्रीमती माधवी परुळकर , श्रीमती विद्या पाटील श्रीमती गीतांजली पाटील, श्रीमती प्रियांका पाटील, श्रीमती ज्योती माजलकर, श्री दत्तगुरु भाबल, श्री मनोज वर्तक, श्रीमती जयश्री माने श्रीमती प्रमिला सरणकर, श्रीमती मनाली मंत्री,श्री दीपक रपसे श्रीमती अनघा पारकर, श्रीमती अदिती घाडीगावकर श्रीमती सायली घाग श्रीमती जयश्री मुळीक, श्रीमती सुमेधा सावंत ,श्रीमती पूर्वा सकपाळ, श्रीमती रुचिता दिपनाईक, श्रीमती सविता निगावले, श्रीमती सायली राणे, श्रीमती सुरेखा उजगरे, श्री मनोहर पवार, श्री सचिन मोहिते, श्रीमती राजश्री मंडलिक इ. शिक्षकांचा समावेश आहे. तसेच महापौर पुरस्कार प्राप्त श्री. संदीप परब, श्री. विठ्ठल वाळुंज आदी  शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला. तसेच  सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा सत्कार, समन्वयक समिती व उपक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व शाळांचा सत्कार तसेच क्रीडा, हस्तकौशल्य, मनाचे श्लोक अशा विविध स्पर्धांमध्ये    सहभाग घेऊन विजयी झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र देऊन कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक श्री. दीपक गावडे तसेच त्यांचे समन्वयक सहकारी मुख्याध्यापक यांनी उत्तमरित्या केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतिशय ओघवत्या वाणीने शिवाई विद्यामंदिर भांडुप शाळेच्या श्रीम.अश्विनी कानोलकर मॅडम यांनी केले.यावेळी सर्व गुणवंत शिक्षक व महापौर पुरस्कार प्राप्त शिक्षक यांनी शिक्षण विभागाचे व श्री. गोरखनाथ भवारी साहेब तसेच आयोजक यांचे आभार व्यक्त केले.

रिपोर्टर

  • Apurva Jadhav
    Apurva Jadhav

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Apurva Jadhav

संबंधित पोस्ट