राहुल लोणीकरांच्या कामाची दखल घेत पक्षाकडून पदोन्नती; भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी राहुल लोणीकर यांची निवड

प्रतिनिधी-

भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री राहुल लोणीकर यांनी आज प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा राजीनामा दिला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सुपूर्द केलेल्या राजीनामांमध्ये सर्वप्रथम प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा दिल्याबद्दल आभार व्यक्त करत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा कार्यक्षेत्रात अधिकाधिक लक्ष देणे गरजेचे असल्याचे राहुल लोणीकर यांनी म्हटले आहे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी खूप मोठी असून संपूर्ण राज्यभरात लक्ष देणे अपेक्षित आहे अशा परिस्थितीत विधानसभा कार्यक्षेत्र वर लक्ष केंद्रित केल्यानंतर राज्य पातळीवर आवश्यक तेवढा वेळ देणे शक्य होणार नाही त्यामुळे राजीनामा स्वीकारण्यात यावा अशी विनंती देखील पत्रात श्री चंद्रशेखर बावनकुळे यांना करण्यात आली होती.

रिपोर्टर

  • Ramkisan Bodakhe
    Ramkisan Bodakhe

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Ramkisan Bodakhe

संबंधित पोस्ट