Breaking News
मरीअम्मा नगर वरळी येथील कुशिनारा बुद्ध विहार या ठिकाणी दरवर्षी प्रमाणे यंदाही,समता सेवा मंडळ,बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 805 तसेच माता सावित्रीबाई फुले महिला मंडळ या तिन्ही संस्थेच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिवस व अशोका विजयादशमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सर्व प्रथम विहारात बुद्ध वंदना घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला वंदन करण्यात आले.त्यानंतर सर्व धम्म उपासकांना अल्पोहार वाटप करण्यात आले.या मंगल प्रसंगी बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 805 चे अध्यक्ष प्रदीप तांबे,ज्येष्ठ सल्लागार अशोक बोरसे रमेश हुडगीकर,मंडळाचे व शाखेचे खजिनदार सुपेन्द्र पवार,उपखजिनदार सागर माने,सभासद अमोल लोंढे संतोष शिंदे,रोहित कांबळे,प्रितम तांबे,माता सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या कार्यकर्त्या पुनम लोंढे,प्रतिभा तांबे,अश्विनी शिंदे,पूजा माने,प्रियंका लोंढे इत्यादी सर्व धम्म उपासक व उपासिका उपस्थित होते.सर्वांच्या उपस्थितीत यंदाचा धम्मचक्र प्रवर्तन दिवस व अशोका विजयादशमी मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Pritam Tambe